धर्म-विचार
मनुष्य रोज खातो-पितो, भोग भोगतो, हें सगळें तो करत असतो. पण एक दिवस एकादशीचा उपवास करतो आणि त्याच्या चित्ताचें समाधान होतें. मुसलमान लोक रमजानच्या दिवसांत उपवास करतात. एकादशीच्या किंवा रमजानच्या नांवाने खाणें सोडणारा मनुष्य हाच एक प्राणी आहे. याचा अर्थअसा की मनुष्याला केवळ खाण्या-पिण्यात किंवा भोग भोगण्यात जीवनाचीं सार्थकता वाटत नाही. तो जेव्हा आपल्या इंद्रियांवर …